हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार आज शिगेला पोहोचला. विविध राजकीय पक्षांच्या प्रचारसभा झाल्या. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भिवानी जिल्ह्यात भवानी खेरा आणि जिंद जिल्ह्यात जुलाना इथं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी छाकरी दादरी इथं प्रचारसभा घेतल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार हेमा मालिनी यांनी कुरूक्षेत्रातल्या तीन मतदारसंघात प्रचार केला. आमआदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनिष सिसोदिया यांनी हिसार आणि अधमपूरमधल्या पक्ष उमेदवारांसाठी रोड शो घेतला. पंजाबचे मंत्री हरपाल सिंग छिमा यांनी फतेहबादला प्रचार केला. उद्या संध्याकाळी प्रचार संपेल.
Site Admin | October 2, 2024 8:10 PM | #विधानसभा निवडणूक | haryana-campaign | हरयाणा
हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार
