हरयाणा विधानसभेच्या सर्व ९० जागांच्या निवडणुकीसाठी आज शांततेत आणि सुरळीत मतदान झालं. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या एक हजार ३१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झालं.
या निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१ टक्के मतदानाची नोंद झाली असल्याचं तिथल्या निवडणूक प्रशासनानं कळवलं.
आता येत्या मंगळवारी ८ ऑक्टोबरला हरयाणासह, नुकत्याच पार पडलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.