जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावं यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या ७ जिल्ह्यातल्या ४० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. ४० जागांपैकी १६ जागा काश्मीर विभागात तर २४ जागा जम्मू विभागात आहेत. या अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यात ३९ लाख १८ हजारांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. या महिन्याच्या १८ आणि १५ तारखेला या निवडणुकीचे पहिले दोन टप्पे झाले. त्या टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६१ पूर्णांक ३८ शतांश टक्के आणि ५७ टक्के मतदान झालं आहे.
Site Admin | September 30, 2024 6:51 PM | Haryana Assembly elections | हरयाणा विधानसभा निवडणूक