डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरयाणामध्ये जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला – मुख्यमंत्री शिंदे

हरयाणामधे जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. तिथल्या जनतेनं डबल इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला असून, या यशाचं निर्विवाद श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना जातं, असं त्यांनी म्हटलय. 

 

हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विकासाला महत्व दिल्याच दिसून आलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. काँग्रेसनं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं मिळालं आहे. उलट जम्मू क्षेत्रात भाजपाची ताकद वाढली आहे, असं ते म्हणाले. 

 

हरियाणामधे भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला.

 

हरयाणाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. हरियाणात जे घडलं तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे, असं ते म्हणाले.

 

दरम्यान, उमर अब्दुल्ला हे नव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतील, असं  नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा