डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या-हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या. पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करुन पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटरने द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली.

 

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रति लिटर साडे ९ रुपये आणि डिझेलवर साडे ३ रुपये उत्पादन शुल्क होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा दर वाढवून लिटरमागे ३२ रुपये केल्याचा दावा त्यांनी केला.  डॉ. मनमोहनसिंह प्रधानमंत्री असताना कच्च्या तेलाचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर होते. त्याकाळात पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा