प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे. ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं आहे. देशात पर्यावरण आणि जल संवर्धनासाठी काम करणारे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत.
यावेळी निसर्ग, पर्यावरण, जल आणि स्वच्छता हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्र होणार आहे.
Site Admin | January 16, 2025 2:13 PM | प्रयागराज | हरित महाकुंभ मेळा
प्रयागराज येथे ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन
