स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा अभियान’ जल्लोशात सुरु आहे. कोल्हापूरमध्ये काल तिरंगा देशभक्ती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. तर रत्नागिरीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातून काल भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. 1 हजार 111 फूट लांबीचा तिरंगा यात्रेचं विशेष आकर्षण ठरला.
नाशिक महापालिकेच्या वतीनंही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाला काल हिरवा कंदील दाखवण्यात आला. परभणीत एका चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर नवी मुंबईत ई बाइक आणि सायकलसह पर्यावरणपूरक तिरंगा रॅलीचा एक अभिनव उपक्रम करण्यात आला.