९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या हर घर तिरंगा अभियानाचं चैतन्यपूर्ण स्वरूप देशभरात दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये एकता आणि राष्ट्राभिमान यांची जोपासना करण्याच्या हेतूने आज संध्याकाळी अहमदाबाद इथं तिरंगा यात्रा झाली. या यात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहभागी झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले.
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत लडाखमधल्या उत्तर विभाग सांस्कृतिक केंद्राने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात कलाकार, शिक्षक, विद्यार्थी यांनी भाग घेतला.
हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशात काढलेल्या सहा हजार फूट लांब तिरंगा यात्रेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संतोष व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाला मिळणारा हा उत्साही प्रतिसाद आनंद देत असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.