डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हर घर तिरंगा अभियानाला देशभरात प्रारंभ/ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना देशाची आदरांजली

९ ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्या सैनिकांना आदरांजली वाहिली असून आजपासून हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. आज ९ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून ते १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी आपल्या घरावर डौलाने तिरंगा फडकवावा आणि त्याबरोबर सेल्फी घेऊन तो फोटो हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करावा, असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केलं आहे. २०२२ साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानाची सुरुवात झाली. मागच्या वर्षी १० कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी तिरंग्या बरोबरचा आपला फोटो संकेतस्थळावर पाठवला होता. यावर्षी या अभियाना दरम्यान देशभरात सुमारे दोनशे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, येत्या १३ ऑगस्ट रोजी दिल्लीत खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असलेली तिरंगा बाईक रॅली काढण्यात येणार आहे, असही शेखावत यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला. लाखो स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या त्‍याग आणि बलिदानातून देशाला स्‍वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्‍यांच्‍यात राष्‍ट्रीयत्‍वाची भावना रूजावी, यासाठी ‘घरोघरी तिरंगा अभियान’ प्रेरणादायी ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यात सर्वत्र तिरंगा यात्रा काढून क्रांतिदिनानिमित्त शहीदांना आदरांजली वाहण्यात आली, तसंच हर घर तिरंगा अभियानात सहभाग नोंदवण्यात आला.

घरोघरी सेलिब्रिटी घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाजमाध्यमावरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा