डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2024 6:22 PM

printer

राज्यात सर्वत्र हर घर तिरंगा अभियानानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन

हर घर तिरंगा या अभियानाचा एक भाग म्हणून नागपूर महापालिकेनं आज तिरंगा मॅरथॉनचं आयोजन केलं होतं. सहायक आयुक्तांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.  नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं आज शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढली.

नाशिक महापालिकेतल्या सर्व  कर्मचाऱ्यांनी आज महापालिका मुख्यालयात हर घर तिरंगा अभियानाची शपथ घेतली. नाशिकमधल्या जेलरोड तसंच देवळाली इथल्या महिला बचत गटांनी तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ घेतली आणि तिरंगा फडकवला. 

सांगली जिल्हा प्रशासनाने तिरंगा सायकल रॅली तर सांगली शहर महापालिकेने तिरंगा मॅरेथॉन आयोजित केली होती. सायकल रॅलीत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक, महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला. 

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे रत्नागिरी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली.

नवी मुंबईत तुर्भे इथं तसंच वाशी इथंही तिरंगा रॅली काढण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यात सहभागी झाले होते.

वसई विरार महापालिका क्षेत्रात तीन किलोमीटरची तिरंगा रन आयोजित केली होती.

धुळे शहरात भागात महापालिकेच्या अधिकारी अणि कर्मचार्‍यांनी नागरीकांना तिरंगा झेंडे दिले आणि हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन केलं.

हिंगोलीत केंद्रसरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने डोंगरकडा इथं हर घर तिरंगा अभियान तसंच चित्र  प्रदर्शन आयोजित केलं आहे. हिंगोली शहरात आज  काढलेल्या तिरंगा यात्रेत महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालिकेने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वितरणही केले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा