डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उस्ताह

राज्यात विविध ठिकाणी आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 

 

Image

 

परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेत आषाढीनिमित्त वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेपासून रूढी गावापर्यंत निघालेल्या दिंडीत वृक्षारोपण, संवर्धन याविषयी मुलांनी घोषणा दिल्या.

 

 

पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली. यावेळी अंमली पदार्थविरोधी शपथ घेण्यात आली.

 

Image

 

आषाढी एकादशीनिमित्त आज धुळे शहरातल्या प्रमुख विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती, तसंच गोताणे गावातल्या विठ्ठल मंदिरात आज महापूजा करण्यात आली. यमुनाई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळाच्या श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहातही आषाढी एकादशी साजरी झाली. इथल्या विद्यार्थिनींना विठ्ठल-रखुमाईच्या पोषाखात सजवून त्यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. 

 

Image

 

रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत आज वारीचं आयोजन केलं होतं. 

 

संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नसरी नामदेव इथंही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

Image

 

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

 

Image

 

कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या नांदवाळ इथल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही आज हजारो भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा