इस्रायलनं आज गाझा पट्टीतल्या हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र गटाच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या तीन ओलिसांची नावं जाहीर केली. इस्राईल आणि पॅलेस्टिन यांच्यात गेल्या महिन्यात झालेल्या युध्दविरामनानंतर दोन्ही देशांमध्ये ओलीसांची देवाणघेवाण करण्याची ही सहावी वेळ आहे.
पॅलेस्टिन सुटका करणार असलेल्या तीन ओलिसांच्या बदल्यात इस्रायलकडून 369 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होण्याची शक्यता असल्याचं हमासच्या कैद्यांसंदर्भातल्या माध्यम विभागानं सांगितलं. या कैद्यांमध्ये 36 जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत तर 333 जण गाझाचे रहिवासी आहेत.