यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणेदोनलाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख ७५ हजार २५ असा निश्चित करणाऱ्या करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हाज आणि उमरा विभागाचे मंत्री एच ई तौफीक़ बिन फौझान अल- राबिया यांच्या उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या झाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हज यात्रा सुखकर व्हावी याकरता शक्य त्या सर्व सेवा सुविधा द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.