हज यात्रा २०२५ साठी विविध राज्यांतल्या तीन हजार सहाशे ७६ अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली आहे. भारतीय हज समितीनं आज या वर्षीच्या हजसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली. या अर्जदारांनी या महिन्याच्या २३ तारखेपूर्वी दोन लाख ७२ हजार ३०० रुपये जमा करणे आवश्यक आहे, अशी सुचना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं केली आहे. तसंच अर्जदारांना यासंदर्भात आवश्यक कागदपत्रं सादर करायला सांगितलं आहे. या वर्षी भारतीय हज समिती द्वारे एक लाख बावीस हजार यात्रेकरूंना पाठवलं जाणार आहे.
Site Admin | January 11, 2025 8:47 PM | Haj yatra
हज यात्रेसाठी 3676 अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी
