उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण ए एस आय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत पुन्हा एकदा करण्याबाबत दाखल याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेली ही याचिका वरिष्ठ पीठाचे नागरी न्यायमूर्ती युगल शर्मा यांनी फेटाळली आहे. ए एस आय नं याआधी सर्वेक्षण न केलेल्या क्षेत्राचं सर्वेक्षण करावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. याबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जलदगती न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता.
Site Admin | October 26, 2024 5:44 PM | उत्तर प्रदेश | ज्ञानवापी सर्वेक्षण
ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण एएसआय मार्फत पुन्हा करण्याबाबत दाखल याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळली
