गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी प्रवाशांना अहवा इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Site Admin | February 2, 2025 3:41 PM | Bus Accident | Gujrat Accident
गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी
