गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील दिसा येथील फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही 23 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असूंन, ढीगऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची ची मदत जाहीर केली आहे.