गुजरातमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण ५ हजार ८४ उमेदवार लढत आहेत. त्यापैकी आज २ हजार ८ जागांसाठी मतदान झालं. याखेरीज १७० जागा आधीच बिनविरोध घोषित करण्यात आल्या आहेत.
आज सर्वत्र शांततेत मतदान झालं. मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था देखील केली होती. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.