दूरदर्शनच्या ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल तसंच प्रसारभारतीला आपल्या प्रेक्षकांची व्याप्ती वाढवण्यास मदत होईल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं दूरदर्शनच्या कार्यालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ओटीटीद्वारे नवे कार्यक्रम प्रेक्षकाच्या भेटीला येतीलच तसंच जुन्या कार्यक्रमांचा आनंदही लुटता येईल, असं सहगल यांनी सांगितलं.
Site Admin | December 7, 2024 7:07 PM | OTT platform
दूरदर्शनच्या ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल-नवनीत कुमार सहगल
