डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 15, 2025 7:09 PM | GUJRAT | Rajasthan

printer

गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने आज गुजरात आणि राजस्थानमधल्या १४ पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत या प्रकल्पांना अडथळे ठरत असलेल्या सुमारे २१ समस्यांचा आढावा घेतला घेतला गेला. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीप भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्प प्रस्तावक उपस्थित होते. प्रकल्प देखरेख गटाच्या माध्यमातून विविध मंत्रालये आणि राज्यसरकारमधला समन्वय वाढवून या समस्या सोडवण्याचा तोडगा या बैठकीत काढला गेला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी असे निर्देशही भाटीया यांनी यावेळी दिले.

 

या सर्व प्रकल्पांपैकी गुजरातमधील खावडा नवीकरणीय ऊर्जा संकूल प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ८१ अब्ज युनिट स्वच्छ उर्जेची निर्मिती होईल अशी माहिती अमरदीप भाटिया यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा