डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 23, 2024 7:49 PM | Gujarat government

printer

गुजरात सरकारकडून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मदत योजना जाहीर

गुजरातमधे यंदा जुलै महिन्यात जोरदार पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी गुजरात सरकारनं ३५० कोटी रुपयांची मदत योजना आज जाहीर केली. गुजरात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी राज्याचे कृषीमंत्री राघवजी पटेल यांनी विधानसभेत ही योजना जाहीर करताना सांगितलं की, नुकसानीच्या संरक्षणानुसार ९ जिल्ह्यांमधल्या ४५ तालुक्यांमधे ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या शेती आणि बागायतीचं नुकसान झालं. त्यामुळे जिरायत शेतीसाठी प्रतिहेक्टर ११ हजार रुपये, तर बागायत शेतीसाठी प्रतिहेक्टर २२ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत दिली जाईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा