डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 14, 2025 2:02 PM | Gujarat

printer

गुजरातजवळ अरबी समुद्रातून १८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाविरोधी पथक आणि भारतीय  तटरक्षक दलाने  काल पहाटे केलेल्या कारवाईत १ हजार ८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुद्देमाल गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला असून एटीएस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. सरकार अमली पदार्थांच्या व्यापाराचं जाळं मूळापासून उखडून टाकत आहे. अमली पदार्थमुक्त भारत करण्याच्या  दिशेने हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते शहा समाजमाध्यमावरल्या  पोस्टद्वारे म्हणाले. 

 

महसूळ गुप्तचर संचालनालयाने मिझोराममधे ५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ५२ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत  दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा