गुजरातमधे समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर इथं पत्रकारपरिषदेत सांगितलं की, ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल. निवृत्त प्रशासकीय अधिकारी सी एल मीणा, ज्येष्ठ वकील आर सी कोदेकर, दक्षिण गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु दक्षेश ठाकर आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता श्रॉफ हे समितीचे इतर सदस्य आहेत.
गुजरातमधल्या विरोधी पक्ष नेत्यांनी या बाबत टीका केली आहे. भाजपाला विविध समुदायांमधे फूट पाडायची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.