डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात

गुजरातमधल्या 13सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रीमंडळांच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

 

गांधीनगरमध्ये याविषयी माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून राज्य सरकारच्या 13 वैद्यकीय महाविद्यालयांतल्या 2100 जागांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली. नव्या निर्णयानुसार शासकीय कोट्यातल्या जागेसाठी असलेल्या साडेपाच लाख रुपये शुल्कात कपात करून ते पावणेचार लाख रुपये तर व्यवस्थापन कोट्यातल्या जागेसाठीचे शुल्क 17 लाख रुपयांवरून 12 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा