जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागानं ती करावी, असं त्यांना सांगितलं.
हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचं अन्न टाळण्याबाबत, तसंच पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, .अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.