विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी, सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्वं जारी केली. विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या, दिभाभूल करणाऱ्या जाहीरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक तत्वं जारी केली.
या संस्थांनी त्यांचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती जाहीर करावी, या वर्गांच्या कार्यपद्धतीबाबतची स्पष्टीकरणं ठळकपणे प्रदर्शित करावीत, विद्यार्थ्यांची छायाचित्रं आणि त्यांची माहिती वापरण्यासाठी त्यांची संमती घ्यावी, आपल्याकडच्या सेवा, सुविधा आणि पायाभूत सुविधांची अचूक माहिती जाहीर करावी, असं त्यात म्हटलं आहे. चुकीचे दावे, हमी आणि यशस्वीतेची टक्केवारी यांची जाहीरातबाजी टाळावी, असंही त्यात म्हटलं आहे.