देशात नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन १ लाख ८२ हजार कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण १लाख ६८ हजार कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. सरकारनं काल ही आकडेवारी जाहीर केली. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३४ हजार १४१कोटी रुपये, राज्य जीएसटी ४३ हजार ४७ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ९१ हजार ८२८ कोटी रुपये तर उपकर १३ हजार २५३ कोटी रुपये आहे.
Site Admin | December 2, 2024 1:46 PM | GST