जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं. डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ८३६ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन ४० हजार ४९९ कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन ४७ हजार ७८३ कोटी रुपये झालं असून उपकर ११ हजार ४७१ कोटी रुपये इतका आहे.
Site Admin | January 1, 2025 6:56 PM | GST