डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली.सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य, राष्ट्राची एकता, अखंडता तसंच, विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरिता देशवासीयांसाठी प्रेरणास्थान राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

गृहमंत्री अमित शहा यांनीही सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५५०हून अधिक संस्थानांचं एकत्रीकरण केलं, आधुनिक भारताच्या निर्मितीची पायाभरणी करून एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा पाया रचला, असं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा