प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या जनतेला या राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यातल्या जनतेला आनंद आणि यश प्राप्त होवो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकातले लोक अत्यंत प्रतिभावान असून त्यांनी अनेक क्षेत्रांत विकास आणि नवकल्पना राबवल्या आहेत अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
केरळही विलोभनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून हे राज्य आपल्या परंपरा आणि मेहनती जनतेसाठी परिचित असल्याचं ते म्हणाले.छत्तीसगड समृद्ध लोकपरंपरा आणि संस्कृतीचा अनोखा संगम असून विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.हरियाणा आपल्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखलं जात असून देशाच्या विकासात या राज्यानं उल्लेखनीय योगदान दिल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
मध्य प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सांस्कृतिक वारशानं समृद्ध राज्य असून विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात या राज्यानं नवीन मानकं प्रस्थापित केल्याची प्रशंसा प्रधानमंत्र्यांनी केली आहे.