डेन्मार्कचा स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँडला अमेरिका अधिग्रहित करू शकेल असा आपला विश्वास असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. नाटो चे महासचिव मार्क रुट यांच्याशी काल व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अमेरिका ग्रीनलँड या बेटाला अधिग्रहित करु शकेल आणि या कामी नाटोचे प्रमुख महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं ट्रम्प म्हणाले.
ग्रीनलँडमध्ये आधीपासूनच अमेरिकी सैन्य असून यापुढे तिथं अधिक अमेरिकी सैनिक असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या ट्रम्प यांच्या मनसुब्याचा विषय आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरचा असून नाटो ला या प्रकारात खेचण्याची आपली इच्छा नसल्याचं रुट यांनी स्पष्ट केलं आहे.