ग्रीनलँडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटीट या पक्षानं २९ पूर्णांक ९ दशांश टक्के मतांसह बाजी मारली आहे. आर्क्टिक खंडावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी अमेरिका-चीन-रशिया यांच्यात चढाओढ सुरु असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागाचा ताबा घेण्याचा मानस जाहीर केला त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या स्वामित्वाखालचा स्वायत्त प्रदेश असून डेन्मार्कपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याकडे सर्व राजकीय पक्षांची वाटचाल सुरु आहे. ग्रीनलँडच्या अंतर्गत सुरक्षा, संरक्षण, परराष्ट्रव्यवहार आणि पतधोरणावर अजूनही डेन्मार्कचं नियंत्रण आहे.
Site Admin | March 12, 2025 2:59 PM | Greenland
ग्रीनलँडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटीट पक्षाची २९.९ टक्क्यांनी आघाडी
