डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे, नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून लोकार्पण

राज्यातल्या तीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पुणे हुबळी, कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गांवर या गाड्या धावतील. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुण्यातल्या रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या गाडीमुळे राज्यातल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 

पुणे हुबळी वंदे भारत आठवड्यातून तीनदा म्हणजे सोमवार, गुरुवार आणि शनिवारी पुण्यातून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. हुबळीतून ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे पाच वाजता सुटेल. कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आलं. खासदार धनंजय महाडिक यावेळी उपस्थित होते. काल या गाडीतून शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मिरज स्थानकापर्यंत मोफत प्रवास केला.

 

मिरज, सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकात या गाडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. ही गाडी दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठला कोल्हापूर स्थानकातून सुटेल आणि प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोनला पुणे स्थानकातून सुटेल. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. कुठल्याही देशाच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक वाहतूक मार्गांचा विकास मोलाचा ठरतो असं राज्यपाल यावेळी म्हणाले. तर मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाची असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

 

 

Image 

 

Image 

 

Image

सर्वाधिक वाचले

सर्व पहा