डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महान उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन, आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव सध्या मुंबईच्या एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. सायंकाळी वरळीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं टाटा यांच्या सन्मानार्थ आज राजकीय दुखवटा जाहीर केला असून आजचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही मंत्रीमंडळानं संमत केला.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा