खराब हवामानामुळे द्राक्षाची बाजारपेठेतील आवक लांबल्यानंतर, आता सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू झाली आहे.
स्थानिक विक्री बरोबरच द्राक्ष निर्यातीलाही सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबियात नऊ कंटेनर्स मधून १७२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
सांगली जिल्ह्यात यंदा ८ हजार ४४० शेतकऱ्यांनी ४ हजार २२० एकर क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.