विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलच्या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय फसव्या कॉलवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी म्हटले आहे. यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करुन फसव्या कॉलला दखलपात्र गुन्हा बनविण्याचा विचार करत आहे, असंही ते यावेळी म्हणाले. उडान योजनेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी १० वर्षांसाठी ही योजना सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यात आणखी ५० विमानतळ सुरू करण्याची किंवा सध्याच्या विमानतळांची क्षमता वाढवण्याची योजना असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | October 21, 2024 8:33 PM | Civil Aviation Minister