हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीची प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. जैव तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त दरात हायड्रोजन उपलब्ध होऊ शकेल. १ डॉलर प्रति किलो दरानं हायड्रोजन निर्मितीचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 19, 2024 8:12 PM | Minister Nitin Gadkari