राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, २४ डिसेंबर रोजी ग्राहक व्यवहार विभाग जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च करणार आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URLची माहिती मिळणं शक्य होणार आहे. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URL ची तक्रार करता येणार आहे.
Site Admin | December 22, 2024 7:57 PM | National Consumer Day