डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2024 1:22 PM | AB PMJAY Cards

printer

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिलं जाणार नवीन कार्ड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार ७० वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना एका आठवड्यात सुरु होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाइटवर अर्ज भरणं आवश्यक आहे. पोर्टलवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध असून ७० वर्षांवरच्या नागरिकांसाठी विशिष्ट लिंक उपलब्ध आहे. खाजगी विमाधारक आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळानं याच आठवड्यात आयुष्मान भारत योजने अंतर्गत मिळकतीच्या कोणत्याही सीमेशिवाय जेष्ठ नागरिकांच्या या योजनेला मंजुरी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा