डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 11, 2025 7:45 PM | AAC | ban | JKIM

printer

केंद्र सरकारची जम्मू-काश्मीरमधील दोन दहशतवादी संघटनांवर बंदी

केंद्र सरकारनं अवामी ॲक्शन कमिटी आणि जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन दहशतवादी संघटनांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भातली अधिसूचना आज जारी केली. या दोन्ही संघटना देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. या संघटनांचे सदस्य दहशतवादी कारवायांना मदतीच्या ठरणाऱ्या आणि जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासारख्या देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा