कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३५ रुपये दरानं कांदाविक्री करत आहे. या आठवड्यापासून देशातल्या प्रमुख शहरांमधे अनुदानित दराने कांदाविक्री सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.