डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचं सहा कलमी धोरण

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रसरकारने सहा कलमी कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.  यात उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात कपात, पिकांना हमीभाव, नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, लागवडीत विविधता आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन या मुद्द्यांचा समावेश आहे. २००२-२००३ मधे शेतकऱ्यांचं उत्पन्न दरमहा दोनहजार ११५ रुपये होतं ते २०१८-१९ या वर्षापर्यंत दरमहा दहा हजार २१८ रुपयांपर्यंत पोहोचलं. त्याखेरीज शेतकऱ्यांना अल्पदराने कर्जपुरवठा, अनुदानित दराने खतं आणि यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन या उपाययोजनाही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना एकूण २लाख १४ हजार कोटी रुपये अनुदान देण्यात आलं तर हमीभावाने विक्रमी खरेदी करण्यात आली असं चौहान यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा