पुढच्या तीन वर्षांमध्ये दोन लाख विमा सखी नेमण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पानिपतमध्ये विमा सखी योजनेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या वर्षी 25 हजार विमा सखी नेमल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये इतकं मानधन दिलं जाईल, असं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेचं उद्घाटन केलं. भारतीय जीवनविमा महामंडळ म्हणजे एलआयसीतर्फे ही योजना राबवली जात आहे.
Site Admin | December 10, 2024 10:48 AM | Bima Sakhi | Finance Minister Nirmala Sitharaman