तृणधान्य आणि तेलबियांमधील आर्द्रता पातळी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आर्द्रता मापकाच्या मसुद्याच्या नियमांसंदर्भात सरकारने सर्व संबंधितांशी चर्चा केली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात काल नवी दिल्लीत बैठक घेण्यात आली. विविध पदार्थांमधील, विशेषतः तृणधान्ये आणि तेलबिया यांच्यातील आर्द्रता मोजण्यासाठी आर्द्रता मापक वापरण्यात येतं. हे मापक, गुणवत्ता आणि साठवण योग्यता निर्धारित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतं. ओलावा पातळी मोजून, शेतकरी आणि व्यापारी धान्याची योग्य निगा राखू शकतात.
Site Admin | July 20, 2024 12:38 PM