डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 17, 2024 1:42 PM | Education

printer

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांना ते माहिती देत होते. सरकारने प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे, गेल्या आठ वर्षांत प्रति बालक खर्चात १३० टक्के वाढ झाली आहे.

 

वर्ष २०१३-१४ मध्ये १०,७८० रुपये असलेली ही रक्कम आता २०२१-२२ पर्यंत २५ हजार ४३ रुपये झाली आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा