देशभरात दळणवळणाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातल्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यानं दिल्ली ते हरयाणा दरम्यानचा प्रवास सोपा होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चार वर्षांत पूर्ण होणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यांतर्गत या कॉरिडॉरला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती.