डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं हे भारतीयांचं कर्तव्य – राज्यपाल रमेश बैस

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.

 

भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योगा ही विशेष अंग – मुख्यमंत्री शिंदे

 

 

भारतीय जीवन शैलीची आयुर्वेद आणि योगा ही दोन विशेष अंगं आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी योगासन शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईत चारकोप मार्केट इथं योगा ऑन स्ट्रीट आणि इतर कार्यक्रमात सहभागी होत योगासनं केली. दादरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा