सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या तर सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि राज्य सरकारचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन केलं आहे.
जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.