राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत के सी महाविद्यालयात ‘एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावरच्या चर्चासत्रचं उद्घाटन झालं. या सत्रात त्यांनी योग आणि ध्यानधारणेचं महत्त्व विशद करत एनसीसी मध्ये मुलींचा सहभाग वाढला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढून नेतृत्व गुणांचा विकास होतो असं ते म्हणाले. या प्रसंगी एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, सैन्यलातले अधिकारी, जवान आणि एन सी सी कॅडेट्स उपस्थित होते.
Site Admin | November 30, 2024 7:08 PM | Governor of Maharashtra | NCC