समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे, असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ व्या राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
Site Admin | March 31, 2025 8:48 PM | Governor CP Radhakrishnan
समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा-राज्यपाल
